
Entertainment News : भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन मंच प्राइम व्हिडिओने आज आपल्या ओरिजिनल सिरीज ‘द फॅमिली मॅन’ च्या अत्यंत अपेक्षित तिसऱ्या सिझनची अधिकृत झलक प्रदर्शित केली. दिग्दर्शक-द्वयी राज आणि डीके यांच्या D2R Films या बॅनरअंतर्गत तयार झालेली ही सिरीज एक थरारक गुप्तहेर-कथा आहे. मनोज वाजपेयी यांच्या प्रमुख भूमिकेत असलेले ‘द फॅमिली मॅन’ हे पात्र श्रीकांत तिवारी म्हणून देशासाठी गुप्तचर एजंट म्हणून कर्तव्य बजावत असतानाच एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा प्रेमळ पती आणि जबाबदार वडील म्हणूनही आपल्या भूमिका निभावतो.