

ankur vadhave
esakal
झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय मराठी अभिनेता अंकुर वाढवे याने एक पोस्ट शेअर करत धक्कादायक माहिती दिली आहे. आपण लोकेशनवर असल्याचं समजताच टोळक्यांकडून आपल्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचं त्याने म्हटलंय. हा प्रकार पुसदमध्ये घडलाय. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये घबराटीचं वातावरण आहे. जवळपास २० ते ३० जणांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचं सांगितलं आहे. वसंत नगर पोलिसांनी यात लक्ष देत प्रकरण वाढण्यापासून थांबवलं. नेमकं काय घडलेलं हे अंकुरने सांगितलं आहे.