

ANSHUMAN VICHARE
ESAKAL
या नवीन वर्षाला म्हणजे गुढी पाडव्याला अनेक मराठी कलाकारांनी नवीन घर घेतल्याची गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. काहींनी या घरांमध्ये गृह्प्रवेशही केला. तर काहींनी सेकंड होमची तजवीज केली. त्यात आता आणखी एका अभिनेत्याचं नाव या यादीत जोडलं गेलंय. हा अभिनेता आहे मराठमोळा हरहुन्नरी कलाकार अंशुमन विचारे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमांमधून अंशुमन घराघरात पोहोचला. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. आता अंशुमनने तिसऱ्या घरात शिफ्ट झाल्याची गुड न्यूज दिलीये.