PRASAD JAWADE'S MOTHER PASSES AWAY
esakal
Prasad Jawade Mourns the Loss of His Mother: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रसाद जवादेला मातृशोक झाला आहे. त्याच्या आईचं म्हणजेच प्रज्ञा जवादेचं काल २८ डिसेंबर रोजी निधन झालं आहे. त्याची आई गेल्या काही दिवसापासून कर्करोगाची सामना करत होती. मात्र त्यांचा लढा अपयशी ठरला. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर मनोरंजनविश्वातून दु:ख व्यक्त केलं जातय.