SANTOSH JUVEKAR’S NEW CAR POST SPARKS TROLL:
esakal
Santosh Juvekar new car Instagram video: प्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकर हा नेहमीच चर्चेत असतो. तो त्याच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नेहमीच ट्रोल होताना पहायला मिळतो. तसंच छावा सिनेमानंतर अक्षय खन्नाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. दरम्यान अशातच आता संतोषने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्याने नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. परंतु सोशल मीडियावर त्याच्या गाडीचं कौतूक सोडून पुन्हा नेटकरी त्याला ट्रोल करताना पहायला मिळतय.