अभिनेता शशांक केतकरने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी त्याने सर्वांना लवकरच बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान शशांकने आता एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. शशांक आणि प्रियांकाला एक गोड मुलगी झाली आहे.