

AMRUTA KHANVILKAR AND HIMANSHU MALHOTRA
ESAKAL
MARATHI ACTORS DIVORCE: बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षात अनेक जोडप्यांनी घटस्फोट (DIVORCE) घेतला. ते लोण मराठी इंडस्ट्रीमध्येही दिसलं. अनेक मराठी कलाकार जोड्यांनी आपण वेगळं होत असल्याची घोषणा केली. त्यातच महिन्याभरापूर्वी लोकप्रिय अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी घटस्फोटाची घोषणा केली. ज्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. त्यांच्यात सारंकाही आलबेल नसल्याच्या चर्चा दोन वर्षांपासून सुरू होत्या. शेवटी त्या चर्चा खऱ्या ठरलेल्या. अशाच चर्चा आणखी एका लोकप्रिय जोडीबद्दल सुरू आहेत. ती म्हणजे मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (AMRUTA KHANVILKAR) आणि अभिनेता हिमांशू मल्होत्रा(HIMANSHU MALHOTRA)