पाऊस बाहेर पडतोय पण मराठी अभिनेत्रीच्या नव्या घरातच सुरू झाला धबधबा; मॉपने काढतेय पाणी, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

MARATHI ACTRESS HOUSE LEAKAGE : छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री पावसाला पक्की वैतागलीये. कारण तिच्या नव्या घरात चक्क गळती सुरू झालीये.
mira jagannath house

mira jagannath house

esakal

Updated on

सध्या सगळीकडेच जोरदार पाऊस पडतोय. ठिकठिकाणी पाणी भरलंय. रस्त्यांना नद्यांचं रूप आलंय आणि नद्या दुथडी भरून वाहतायत. नुकताच इंद्रायणी नदीला पूर आल्याने प्रशासनाने वारकऱ्यांसाठी काही सूचना दिल्या होत्या. तर दुसरीकडे मिसिंग लिंकवर दरड कोसळली होती. अनेक ठिकाणी झाडं पडलीयेत तर काही ठिकाणी भूसख्खलन झालंय. अशातच पावसाने आपलं रौद्ररूप अभिनेत्रीला देखील दाखवलं आहे. तिच्या नवीन घरात अक्षरशः धबधबा असल्यासारखं पाणी पडतंय. आता हे पाणी नेमकं कुठून आणि का पडतंय हे देखील तिला समजत नाहीये. ती फक्त पाणी काढून दमलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com