'ठरलं तर मग' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. दरम्यान मालिकेतील अर्जुनची बहीण अस्मिताचं पात्र साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडे ही सुद्धा घराघरात पोहोचली. दरम्यान तिने काही महिन्यापूर्वी आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. दरम्यान तिच्या घरी एका गोड पाहुण्याचं आगमन झालं आहे.