
Marathi Entertainment News :मराठी इंडस्ट्रीमधील सुंदर अभिनेत्री आणि नृत्यांगना मृण्मयी देशपांडे तिच्या अभिनयासाठी लोकप्रिय आहे. पण त्याबरोबरच ती चर्चेत असते ते गेल्या काही वर्षांपासून तिने निवडलेल्या जीवनशैलीमुळे. मृण्मयी आणि तिचा नवरा स्वप्नीलने मुंबईला राम राम करत महाबळेश्वरला राहण्याचा निर्णय घेतला आणि ते तिथे शेती करतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने शेतकरी म्हणून आयुष्य जगताना तिच्या आयुष्यात झालेल्या बदलावर भाष्य केलं.