

Bapya Movie Rajashri Deshpande
Esakal
Marathi Entertainment News : प्रेम, नाती आणि मैत्री यांची वेगळी बाजू उलगडणारा ‘बाप्या’ सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला असून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटातील संवेदनशील कथा, कलाकारांचा अभिनय आणि विशेषतः राजश्री देशपांडे हिचा अनोखा लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. प्रेक्षकांना राजश्रीचा शैलजापासून शैलेशपर्यंतचा प्रवास प्रचंड भावत असून तिच्या अभिनयासोबतच तिच्या लूकचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.