

Ashwini Gorle Bold Paithani Dress
ESakal
पारंपारिक पैठणी साडीच्या कापडापासून किंवा डिझाईनपासून तयार केलेले विविध प्रकारचे पैठणी ड्रेस लोकप्रिय आहेत. अनेक कलाकार पारंपारिक पैठणी साडीपासून बनवलेले नवनवीन प्रकारचे ड्रेस परिधान करतात, जे चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. मात्र एका मराठी अभिनेत्रीने झी मराठी पुरस्कार सोहळ्यात पैठणीपासून शिवलेला बोल्ड ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अभिनेत्रीला ट्रोलिंग केलं जात आहे. मात्र या ट्रोलिंगनंतर अभिनेत्रीनं स्वतःची बाजू मांडली आहे.