Varsha Usgaonkar Cheated Of ₹47 Lakh In Investment Scam
esakal
Varsha Usgaonkar And Others Report Investment Fraud: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यासोबत एक धक्कादायक घटना घडलीय. त्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. वर्षा उसगांवकर यांच्यासह अनेक अभिनेत्रींची जवळपास ४७ लाखांची फसवणूक झाल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिग्दर्शक आणि बांधकाम व्यावसायिक अविनाश जाधव यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.