

PRANIT MORE
ESAKAL
लोकप्रिय मराठी कॉमेडियन आणि 'बिग बॉस १९'चा स्पर्धक असलेला प्रणित मोरे प्रेक्षकांचा आवडता आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या चांगलीच मोठी आहे. त्याच्या लाइव्ह शोला प्रेक्षक चांगलीच गर्दी करतात. मात्र आता शोमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे तो चांगलाच अडचणीत सापडलाय. प्रणितच्या शोमध्ये एका प्रेक्षकाने महिलांबद्दल अश्लील टिप्पणी केली होती. ज्यावर प्रणित हसला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर प्रणीतला सोशल मीडियावर याबद्दल जाब विचारला जाऊ लागला. तो तुफान ट्रोल झाला. मात्र यानंतर प्रणितने स्टोरी शेअर करत माफी मागितली आहे.