आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या नृत्यांवर तिचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. दरम्यान तिने गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने नवीन गाण्याचं पोस्टर पोस्ट केलं आहे.