Life Line: 'लाईफ लाईन' चित्रपटाची घोषणा; अशोक सराफ, हेमांगी कवीसह 'हे' कलाकार साकारणार भूमिका

Life Line: 'लाईफ लाईन' (Life Line) या आगामी मराठी चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावरून घोषणा करण्यात आली आहे.
Life Line
Life LineESAKAL

Life Line: विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मराठी चित्रपटांची घोषणा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. अशातच आता आणखी एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.क्रिसेंडो एन्टरटेनमेंट निर्मित, 11 आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'लाईफ लाईन' (Life Line) या आगामी मराठी चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावरून घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाच्या पोस्टरची झलक आणि शीर्षक पाहता या चित्रपटाच्या विषयाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची आता प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

'लाईफ लाईन' ची स्टार कास्ट

आधुनिक विज्ञान आणि जुन्या रीतिरिवाजांचा संघर्ष अशी संकल्पना असणाऱ्या लाईफ लाईन या चित्रपटात लोकप्रिय अभिनेते माधव अभ्यंकर आणि महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त महानायक अशोक सराफ प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सोबतीला हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर अशी तगड्या कलाकारांची फौज आहे. साहिल शिरवैकर दिग्दर्शित 'लाईफ लाईन' ह्या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीत राजेश शिरवैकर यांचे आहेत. अशोक पत्की ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर ह्यांचा आवाज लाभला आहे तर लालजी जोशी, कविता शिरवैकर, मिलिंद प्रभुदेसाई, संध्या कुलकर्णी, अमी भुता, संचीता शिरवैकर, उदय पंडीत, शिल्पा मुडबिद्री 'लाईफ लाईन' चे निर्माते आहेत. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Life Line
Ye Re Ye Re Paisa: "कुणी पैशात खेळतं, तर कुणी पैशासाठी..!"; 'येरे येरे पैसा 3' ची घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

'लाईफ लाईन' चित्रपटाचे दिग्दर्शक साहिल शिरवैकर म्हणतात, " सामाजिक भान आणि व्यावसायिक मूल्यं राखून हा चित्रपट आम्ही बनवलेला आहे. विधात्याने रेखाटलेली तळहातावरची 'आयुष्य रेखा' आपण वाढवू शकतो का? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही ह्या चित्रपटातून केलेला आहे. अनोखी कथा, अनोखा संघर्ष, अनोखी मांडणी, अनोखी पात्रनिवड आणि तगड्या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी ही ह्या चित्रपटाची वैशिष्ट्यं म्हणता येतील. बाकी अशोक सराफ सर चित्रपटांच्या निवडीबाबत किती चोखंदळ असतात हे सर्वांना माहीत आहेच. त्यांनी आमचा चित्रपट स्विकारला म्हणजे विषय संपला.

Life Line
Phullwanti : प्राजक्ताची फुलवंती ! अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्राजक्ताचं सिनेनिर्मिती क्षेत्रात पदार्पण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com