Mumbai Local: "एक अबोल प्रेम कथा"; 'मुंबई लोकल' मध्ये झळकणार ज्ञानदा अन् प्रथमेश परब, पोस्टरनं वेधलं लक्ष

Mumbai Local: मुंबई लोकल (Mumbai Local) या चित्रपटात प्रथमेश आणि ज्ञानदाची जोडी पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार असून या नव्या जोडीविषयी चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Mumbai Local
Mumbai Localesakal

Mumbai Local: अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar) यांच्या मुंबई लोकल या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई लोकल (Mumbai Local) या चित्रपटात प्रथमेश आणि ज्ञानदाची जोडी पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार असून या नव्या जोडीविषयी चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण झाली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर चित्रपटाच्या टीमने सिद्धिविनायक चरणी दर्शन घेऊन या चित्रपटाची घोषणा केली आहे.

टाइमपास, टकाटक, बालक पालक अशा अनेक चित्रपटांतून अभिनेता प्रथमेश परबनं आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. विनोदी भूमिकांसह त्याच्यातील गंभीर अभिनेत्याचं दर्शन प्रेक्षकांना घडवलं आहे. तर ज्ञानदा रामतीर्थकरनं प्रामुख्यानं टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला आहे. ज्ञानदाच्या सख्या रे, जिंदगी नॉट आऊट, शतदा प्रेम करावे, ठिपक्यांची रांगोळी अशा मालिका गाजल्या आहेत. त्याशिवाय धुरळासारखे काही चित्रपटही तिनं केले आहेत. आता ज्ञानदा आणि प्रथमेश हे मुंबई लोकल या चित्रपटात स्क्रिन शेअर करणार आहेत.

बिग ब्रेन प्रॉडक्शन्सचे निलेश राठी यांनी "मुंबई लोकल" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्राची राऊत, सचिन अगरवाल सहनिर्माते असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजित करणार आहेत.

'मुंबई लोकल' चित्रपटाची स्टार कास्ट

मुंबई लोकल या चित्रपटात प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे आदी कलाकारही आपल्याला या चित्रपटातून भेटीस येणार आहेत. चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी करणार असून संकलन स्वप्निल जाधव यांचे आहे. क्रिएटिव्ह प्रोडूसर आणि सह दिग्दर्शक विनोद शिंदे असून कलादिग्दर्शक म्हणून सुमित पाटील पाहणार आहेत. कार्यकारी निर्माता नीलेश गुंडाळे तर रश्मी राठी कपडेपट पाहणार आहेत. संगीतकार म्हणून देव आशिष आणि हर्षवर्धन वावरे काम पाहत आहेत.

Mumbai Local
Mumbai Localesakal
Mumbai Local
Phullwanti : प्राजक्ताची फुलवंती ! अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्राजक्ताचं सिनेनिर्मिती क्षेत्रात पदार्पण

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेमध्ये घडणारी एक मनोरंजक कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे.

Mumbai Local
Ye Re Ye Re Paisa: "कुणी पैशात खेळतं, तर कुणी पैशासाठी..!"; 'येरे येरे पैसा 3' ची घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com