
Marathi News : नाट्यपरिषद ही आपल्या मराठी नाट्य सृष्टीची शिखर संस्था. नाटक, रंगकर्मी आणि प्रेक्षक यांच्यातील सेतू म्हणून काम करत असताना अनेक अभिनव उपक्रम, संकल्पना नाट्यपरिषद सातत्याने राबवत असते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे प्रथमच विशेष नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.