Kamali Becomes First Marathi Serial to Feature on New York Times Square
esakal
झी मराठीवरील कमळी ही मालिका सध्या घराघरात पोहचली आहे. मालिकेत सध्या वेगवेगळे ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. अशातच आता मालिकेतील 'कमळी'चा विशेष प्रोमो अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकला. त्यानंतर कमळीची एकच चर्चा मनोरंजनविश्वात रंगली. कारण मराठी मालिका विश्वामध्ये न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकणारी पहिली मराठी मालिका कमळी ठरलीय.