

marathi serial trp
esakal
छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये गेल्याबकही वर्षात बरीच चढाओढ पाहायला मिळते. टॉप १० मध्ये स्थान मिळवण्यासाठी स्टार प्रवाह आणि झी मराठीच्या मालिकांमध्ये मोठी चुरस असते. त्यात गेले कित्येक महिने स्टार प्रवाहने टीआरपी यादीवर आखाती वर्चस्व ठेवलं होतं. स्टार प्रवाहच्या मालिका या प्रेक्षकांच्या आवडीच्या होत्या. मात्र आता या वर्चस्वाला धक्का देण्याचं काम झी मराठीच्या मालिकांनी केलं आहे. झी मराठीच्या मालिका आता टीआरपी यादीत स्टार प्रवाहला वरचढ ठरत आहेत. इतकंच नाही या आठवड्यात झी मराठीच्या तब्बल ५ मालिका स्लॉट लीडर ठरल्यात.