
Marathi Entertainment News : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले असून त्यांच्या या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा सुरू असतानाच, या चित्रपटातील नवीन रोमँटिक गीत ‘सोबती’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मैत्रीला अर्पण केलेले हे हृदयस्पर्शी गीत आहे. ‘सोबती’ हे या चित्रपटातील तिसरे गाणे असून, याआधी ‘पांडुरंग’ या भावस्पर्शी गाण्याने आणि ‘आलेच मी’ झगमगत्या लावणीने रसिकांची मने जिंकली आहेत.