
Marathi Entertainment News : महाराष्ट्राची क्रश म्हणून जी अभिनेत्री सतत चर्चेत असते ती म्हणजे प्राजक्ता माळी. आजवर प्राजक्ताने फक्त अभिनेत्री म्हणूनच नाही तर उत्तम नृत्यांगना म्हणून ओळख कमावली आहे. याबरोबरच प्राजक्ता एक बिझनेसवुमनही आहे. प्राजक्तराज हा तिचा ज्वेलरी ब्रँड आहे तर तिची भरतनाट्यम शिकवणारी संस्था पुण्यात आहे. याशिवाय ती एक निर्मातीही आहे.