IRON MAN: हल्ककडून पराभूत होताच टोनी स्टार्कचं रूप बदललं! आयर्न मॅनचं भयानक 'आयर्न थिंग'मध्ये रूपांतर!

MARVEL INTRODUCES TONY STARK AS THE IRON THING:मार्व्हलच्या 'Hulk War: Infernal Rage' या नव्या कॉमिकमध्ये टोनी स्टार्कचा भयानक 'आयर्न थिंग' अवतार पाहायला मिळणार आहे. काय आहे या रूपांतरामागची कहाणी आणि कधी रिलीज होणार कॉमिक? जाणून घ्या.
 IRON MAN

IRON MAN

ESAKAL

Updated on: 

IRON MAN TRANSFORMATION INTO THE IRON THING EXPLAINED: मार्व्हलच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. जगभरात लोकप्रिय असलेला आयर्न मॅन म्हणजेच टोनी स्टार्कचा आता एक नवा आणि वेगळा अवतार पहायला मिळणार आहे. मार्व्हलने आपल्या येणाऱ्या कॉमिक स्टोरीलाइनमध्ये टोनी स्टार्कला चक्क 'आयर्न थिंग' या भयानक रुपात दाखवलं आहे. विशेष म्हणजे, या नव्या अवतारात टोनी स्टार्क नेहमीसारखा हायटेक सूट घातलेला सुपरहिरो नसून एका महाकाय राक्षसी प्राण्यासारखा दिसणार आहे.

Loading content, please wait...