

mayuri deshmukh
esakal
झी मराठीवरील गाजलेली मालिका 'खुलता कळी खुलेना' मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. तिच्या दिसण्याचं आणि अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. या मालिकेत ती मुख्य भूमिकेत झळकली होती. मात्र या मालिकेनंतर ती मराठी मालिकांमध्ये दिसली नाही. प्रेक्षक तिच्या पुढील मालिकेची वाट पाहत होते मात्र त्यानंतर ती मालिकांमध्ये दिसलीच नाही. आता नुकत्याच लोकशाही;या दिलेल्या मुलाखतीत मयुरीने तिच्या या निर्णयामागचं कारण सांगितलं आहे.