

MEGHANA ERANDE ON SHOOTING IN KOKAN
ESAKAL
गणपती बाप्पाशी असलेलं नातं हे मेघना एरंडे यांच्या आयुष्याचा लहानपणापासूनच एक सुंदर भाग राहिलं आहे. एरंडे कुटुंबात बालपणी अनुभवलेला गणेशोत्सव, लग्नानंतर जोशी कुटुंबात जपलेल्या परंपरा आणि आता ‘सनई चौघडे’ मालिकेतून परब कुटुंबाचा गणेशोत्सव अनुभवण्याचा मिळालेला योग, असा त्यांच्या गणेशोत्सवाचा सुंदर प्रवास आहे. बाप्पासोबतचं हे नातं त्यांच्यासाठी श्रद्धेपलीकडचं असून एका जिवलग मित्रासारखं आहे. यंदाच्या कोकणातील गणेशोत्सवाच्या चित्रीकरणाने या नात्यात आणखी एका खास आठवणीची भर पडली.