
Marathi Entertainment News : आई कुठे काय करते या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे अभिनेते मिलिंद गवळी घराघरात पोहोचले. त्यांनी साकारलेली अनिरुद्ध ही भूमिका खूप गाजली. बायकोवर हक्क गाजवणारा अहंकारी अनिरुद्ध अनेकांना आवडला. नुकतंच त्यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लहानपणीची हृदयस्पर्शी आठवण सांगितली.