MILIND SOMAN
esakal
MILIND SOMAN SWIMS FROM EUROPE TO AFRICA: अभिनेते मिलिंद सोमण त्यांच्या फिटनेसमुळे चर्चेत असतात. ते फिटनेस संदर्भात सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांच्या फिटनेसची नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चा रंगताना पहायला मिळते. दरम्यान अशातच मिलिंद सोमण यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. त्याची पोस्ट पाहून सगळेच चकित झालेत. वयाच्या ६० व्या वर्षी ते चक्क युरोपमधून आफ्रिकेत पोहत गेलेत.