

Miss Universe 2025 Judge Resigns After Allegations of Affair and Bias
Esakal
थायलंडमध्ये सुरू असलेल्या मिस युनिव्हर्स २०२५ स्पर्धेच्या अंतिम फेरीला अवघे तीन दिवस शिल्लक असतानाच जज ओमर हारफूश यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी मिस युनिव्हर्स २०२५ वर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ओमर यांनी शोवर आरोप करताना म्हटलं की, टॉप ३० स्पर्धक आधीच निवडले गेले होते. अधिकृत निवड सुरू होण्याआधीच यादी तयार केली होती. ओमर यांनी आरोप करत अचानक राजीनामा दिला आणि सातत्यानं सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केल्या आहेत.