

Marathi Entertainment News : ॲक्शनचा भरणा असलेल्या आणि आरडीएक्सचा शोध घेणाऱ्या ‘मिशन’ या चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वत्र धुमाकूळ घातलाय. उत्तम ॲक्शन सीन्स, कलाकारांचा वाखाणण्याजोगा अभिनय, संवाद आणि गाणी या सगळ्यांचाच मेळ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये साधून आला आहे. हा थरारक आणि थक्क करणारा चित्रपटाचा ट्रेलर पाहून येत्या १५ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या ॲक्शन चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षक वर्गात लागली आहे. मराठीतही ॲक्शन चित्रपट येऊ शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘मिशन’ हा सिनेमा आहे.