Mohammed Rafi's magic Story: 102 डिग्री ताप असूनही मोहम्मद रफी यांनी गायलेल्या 'या' अप्रतिम गाण्याचे, सहा दशकानंतर आजही आहेत लाखो चाहते!

Mohammed Rafi Birth Anniversary Special Story : जाणून घ्या, नेमकं कोणतं आहे ते गाणं आणि कोणत्या चित्रपटातील आहे?
On Mohammed Rafi Birth Anniversary, revisit the iconic Mohammed Rafi song recorded despite high fever, still loved after six decades.

On Mohammed Rafi Birth Anniversary, revisit the iconic Mohammed Rafi song recorded despite high fever, still loved after six decades.

esakal

Updated on

Mohammed Rafi's iconic song : आवाजाचे जादूगार मोहम्मद रफी यांचा २४ डिसेंबर १९२४ रोजी पंजाबमधील अमृतसरच्या कोटला सुलतान सिंग गावात जन्म झाला होता. त्यांची आज १०१ वी जयंती आहे. या निमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला जात आहे.

मोहम्मद रफी यांनी ६४ वर्षांपूर्वी अंगात तब्बल १०२ डिग्री एवढा तीव्र ताप असूनही एक आयकॉनिक गाणे रेकॉर्ड केले होते. जे देशभरातील श्रोते आजही ऐकत आहेत आणि त्याचा आनंद घेत आहेत.

जवळजवळ चार दशकांच्या त्यांच्या गायन कारकिर्दीत, मोहम्मद रफी यांनी अनेक उल्लेखनीय गाण्यांना आपला आवाज दिला आणि सुपरहिट गाणी मिळवली. पण एक गाणे असे होते ज्याच्या रेकॉर्डिंग दरम्यान रफी साहिबांना बरे वाटत नव्हते. त्यांचे शरीर तापाने फणफणत होते, तरीही त्यांनी ते गाणे गायले, त्यांची आवड दाखवत.

On Mohammed Rafi Birth Anniversary, revisit the iconic Mohammed Rafi song recorded despite high fever, still loved after six decades.
Couple on Railway Track Viral Video : प्रेम आंधळं असतं ऐकलय, पण इतकं? ; रेल्वेखाली बसले होते गुटरगु करत, क्षणात निघाली रेल्वे अन् मग...

खरंतर, १०२ डिग्री ताप असलेल्या व्यक्तीला नीट बोलताही येत नाही. पण जर अशा परिस्थितीतही एखादा गायक गाणं गात असेल, तर यातून त्याचे गाण्याबद्दलचे समर्पण दिसते. मोहम्मद रफी यांनी  गायलेले ते गाणे अभिनेता धर्मेंद्र यांच्या 'शोला और शबनम' या चित्रपटातील होते.

On Mohammed Rafi Birth Anniversary, revisit the iconic Mohammed Rafi song recorded despite high fever, still loved after six decades.
Abu Azmi on Bangladesh Mob Lynching : बांगलादेशात जमावाने हिंदू तरूणास बेदम मारून जाळलं ; संतापजनक घटनेवर अबू आझमींची प्रतिक्रिया, म्हणाले...

तर त्या गाण्याचे बोल होते "जाने क्‍या ढूंढती रहती हैं ये आंखें मुझमें.." आयएमडीबीच्या वृत्तानुसार, या गाण्याच्या रेकॉर्डिंग दरम्यान मोहम्मद रफी हे खूप आजारी होते, परंतु तरीही त्यांनी त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत साडेतीन मिनिटांचे गाणे उत्कृष्टपणे गायले. जेणेकरून संगीतकार आणि निर्मात्यांना कोणतेही नुकसान होऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com