

नेमक्याच तरीही प्रभावी भूमिका करण्याकडे ओढा असणाऱ्या कलाकारांमध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव ही नावे आवर्जून घेतली जातात. आतापर्यंत मोजक्या पण हटके चित्रपटांमध्ये दिसणारे हे दोन चतुरस्त्र कलाकार दिग्दर्शक विशाल पी.गांधी यांच्या 'आतली बातमी फुटली' या आगामी मराठी चित्रपटातून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येत आहेत. या दोघांचं एक पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. ज्यात मोहन आगाशे यांनी सिद्धार्थ जाधव याच्यावर बंदूक रोखलेली पाहायला मिळतेय. या मागचं नेमकं कारण काय असेल ? हे पाहण्यासाठी ६ जूनला येणारा 'आतली बातमी फुटली' हा चित्रपट पाहावा लागेल.