Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

Mouni Roy: नागिन या मालिकेत काम करण्यापूर्वी मौनी रॉयची तब्येत इतकी बिघडली होती, तिला दिवसातून 30 गोळ्या घ्याव्या लागत होत्या.
Mouni Roy
Mouni Royesakal

Mouni Roy: छोट्या पडद्यासोबत बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. मौनी रॉयने क्यूंकी सास भी कभी बहू थी (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi) या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे, पण नागिन (Naagin) या मालिकेमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. पण नागिन या मालिकेत काम करण्यापूर्वी मौनी रॉयची तब्येत इतकी बिघडली होती, तिला दिवसातून 30 गोळ्या घ्याव्या लागल्या आणि अनेक वेळा इंजेक्शन घ्यावे लागले, असं तिनं एका मुलाखतीत सांगितलं.

मौनी रॉय म्हणाली, "मी तीन महिने अंथरुणाला खिळून होतो"

मौनी रॉयने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिच्या तब्येतीबद्दल सांगितलं.ती म्हणाली, नागिन मालिका सुरू होण्यापूर्वी मी अशा टप्प्यात होते, जेव्हा असे वाटत होते की, माझे आयुष्य संपले आहे. माझी तब्येत खूप बिघडली होती. मला L-4-L-5 चा प्रॉब्लेम झाला होता. तेव्हा मला सरळ उभे राहता येत नव्हते. मी दिवसातून 30 गोळ्या घेत होते. मला इंजेक्शनही देण्यात आले."

मौनी रॉय पुढे सांगितलं, - "जेव्हा मला नागिन मालिकेची ऑफर आली तेव्हा ती तीन महिने खिळून होते. माझे वजन किती किलो वाढले आहे हे मला माहीत नाही... तो काळ माझ्यासाठी खूप वाईट होता. मी तीन महिने अंथरुणाला खिळून होतो आणि याच काळात मला नागिन मालिकेची ऑफर आली होती."

Mouni Roy
Mouni Roy: मौनीला सतावतेय कसली चिंता? 9 दिवसांनंतर हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज

मौनीनं 'या' चित्रपटांमध्ये केलंय काम

मौनीनं ब्रह्मास्त्र, गोल्ड या चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. तसेच तिनं देवों के देव महादेव या मालिकेत देखील काम केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com