
आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त मार्वे बीचवर ‘मेगा क्लिन अप ड्राइव्ह’ आयोजित करण्यात आला.
या उपक्रमात ‘वडापाव’ चित्रपटाची टीम – प्रसाद ओक, गौरी नलावडे, रितिका श्रोत्री, शाल्व किंजवडेकर, निनाद बत्तीन यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता, सागरी जीवनाचं रक्षण आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता.