Mrinal Kulkarni : "त्याला फोटो-बिटो आवडत नाही" ; नव-यासाठी मृणाल यांची खास पोस्ट

Mrinal Kulkarni Wedding Anniversary Post : अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या नव-यासाठी सोशल मिडीयावर खास पोस्ट शेअर केली.
Mrinal Kulkarni Wedding Anniversary
Mrinal Kulkarni Wedding AnniversaryEsakal

मराठी इंडस्ट्रीमधील एव्हरग्रीन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी कायम काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. मराठीबरोबरच हिंदीमध्येही मृणाल यांनी बरंच काम केलं आहे आणि त्यांचा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणात आहे. आज मृणाल यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे यानिमित्त त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने सगळयांचं लक्ष वेधून घेतलं.

मृणाल यांची पोस्ट

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये मृणाल म्हणतात,"त्याला फोटो बिटो आवडत नाहीत.. तिला फोटो बिटो आवडतात ... वर्षानुवर्ष अनेक बाबतीत हे असंच चालू आहे आणि वर्षानुवर्ष हे असंच चालू राहणार !!! कारण .. प्रेम म्हणजे प्रेम असतं

आता फोटोंचा क्रम तुम्हीच ठरवा बुवा !"

त्यांच्या या हटके शुभेच्छा अनेकांना आवडल्या असून त्यांच्या चाहत्यांनी कमेंट करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मृणाल आणि रुचिर यांच्या लग्नाला ३४ वर्षं पूर्ण झाली. खूप लहान वयात या दोघांचं लग्न झालं. मृणाल आणि रुचिर लहानपणापासून एकमेकांचे मित्र होते आणि नंतर एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नाच्या वेळी मृणाल यांचं वय अवघं १९ वर्षे होतं. १० जून १९९० ला या जोडीचा विवाहसोहळा पार पडला.

लग्नानंतर मृणाल यांच्या सिनेविश्वातील कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. त्याबरोबरच त्यांनी त्यांनी त्यांचं शिक्षणही पूर्ण केलं.

Mrinal Kulkarni Wedding Anniversary
Mrinal Kulkarni: लाडक्या लेकाला वाढदिवसाच्या दिल्या भरभरून शुभेच्छा

मृणाल यांचा लवकरच एक दोन तीन चार हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात त्यांच्याबरोबर वैदेही परशुरामी, निपुण धर्माधिकारी यांची मुख्य भूमिका आहे. १९ जुलै २०२४ मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.

मृणाल यांचे पती रुचिर हे वकील आहेत तर मृणाल यांचा मुलगा विराजसनेही आईच्या पाऊलावर पाऊल ठेवत अभिनयक्षेत्रात पदार्पण केलंय. विराजसचं सध्या रंगभूमीवर नाटक सुरु असून त्याने मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. विराजसने एका सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर त्यांची सून शिवानी रांगोळेही अभिनयक्षेत्रात असून झी मराठीवर तिची 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत काम करतेय.

Mrinal Kulkarni Wedding Anniversary
'वेड' नंतर बरसणार प्रेमाच्या 'सरी', Mrinal Kulkarni आणि Ajinkya Raut चा नवा रोमँटिक सिनेमा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com