
mrunal dusanis
esakal
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अमृणाल दुसानिस 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर तिने 'तू तिथे मी', 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिका देखील केल्या. मात्र त्यानंतर ती लग्न करून परदेशात स्थायिक झाली. तिने नीरज मोरेसोबत लग्नगाठ बांधली आणि अमेरिकेत स्थायिक झाली. मात्र त्यानंतर काही वर्षांनी ती पुन्हा भारतात परतली. मुलीच्या जन्माच्या ४ वर्षानंतर ती भारतात आली. इथे येऊन तिने नवीन हॉटेलसुद्धा सुरू केलं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने अमेरिका सोडून भारतात परतण्याचं कारण सांगितलं आहे.