

MRUNAL DUSANIS
ESAKAL
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. मृणाल कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. तिच्या अभिनयासोबतच तिचा साधेपणा प्रेक्षकांना भावला. तिने 'असं संसार सुरेख बाई', 'तू तिथे मी', 'हे मन बावरे' अशा अनेक मालिका केल्या. ज्या सुपरहिट ठरल्या. २०१६ मध्ये मृणालचं अरेंज मॅरेज झालं. तिने नीरज मोरेशी लग्नगाठ बांधली. मात्र तेव्हा मृणाल करिअरच्या शिखरावर होती. आणि नीरजचं काम परदेशात होतं. त्यामुळे ते सुरुवातीची काही वर्ष लॉन्ग डिस्टन्समध्ये राहिले होते. ते त्यांनी कसं केलं याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलंय.