

mrunal dusanis
esakal
'छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'लग्नानंतर होईलच प्रेम' प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. या मालिकेने काही महिन्यातच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. मालिकेतील पार्थ काव्या आणि नंदिनी जीवाची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. मालिकेत मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विजय आंदळकर, विवेक सांगळे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसतायत. नुकताच या मालिकेच्या कलाकारांसाठी खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीतले अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. मात्र त्यातल्या मृणाल दुसानिसच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.