Munjya: 'मुंज्या'ची बॉक्स ऑफिसवर जादू; दोन दिवसात केली एवढी कमाई

दोन दिवसात मुंज्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...
'मुंज्या'ची बॉक्स ऑफिसवर जादू; दोन दिवसात केली एवढी कमाई
Munjya box office collection day 2SAKAL

Munjya box office collection day 2: गेल्या काही दिवसांपूर्वी मुंज्या (Munjya) या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. अनेकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. हा चित्रपट शुक्रवारी (7 जून) रिलीज झाला. आता दोन दिवसात या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...

'मुंज्या'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

आदित्य सरपोतदारनं दिग्दर्शित केलेल्या 'मुंज्या' या चित्रपटानं ओपनिंग-डेला चांगली कमाई केली. sacnilk च्या रिपोर्टनुसार, पहिल्या रिलीजच्या दिवशी (7 जून) मुंज्या या चित्रपटानं 4 कोटींची कमाई केली. तर रिलीजच्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे. शनिवारी (8 जून) या चित्रपटानं जवळपास 7.25 कोटींची कमाई केली. दोन दिवसात मुंज्या या चित्रपटानं 11.25 कोटींची कमाई केली.

मुंज्या 'भैया जी' आणि 'मिस्टर अँड मिसेज माही' या चित्रपटांसोबत मुंज्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. अशातच या मुंज्या या चित्रपटाच्या कथेला आणि या चित्रपटात वापरण्यात आलेल्या VFX ला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटातील शरवरी वाघ आणि अभय वर्मा यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आता हा चित्रपट रविवारी (9 जून) बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

'मुंज्या'ची बॉक्स ऑफिसवर जादू; दोन दिवसात केली एवढी कमाई
Munjya Movie Twitter Review: हॉरर आणि कॉमेडीची रोलरकोस्टर राइड; जबरदस्त कथा अन् अंगावर शहारे आणणारे सीन्स, थरारक 'मुंज्या' जिंकतोय प्रेक्षकांची मनं

मुंज्या चित्रपटाची कहाणी एका मुलावर आधारित आहे. तो मुलगा त्याच्यापेक्षा ७ वर्षांनी मोठ्या असलेल्या मुन्नीच्या प्रेमात पडतो. त्याला तिच्याशी लग्न करायचे आहे, पण त्या मुलाचं मुन्नीसोबत लग्न होत नाही, त्यानंतर पुढे काय घडतं? हे पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जावं लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com