

muramba serial end
esakal
छोट्या पडद्यावर येत्या महिन्याभरात मोठे बदल होणार आहेत. स्टार प्रवाह आणि झी मराठी या वाहिन्यांवर काही नवीन कार्यक्रम सुरू होणार आहेत. त्यासाठी काही जुन्या मालिका निरोप घेणार आहेत. तर काही मालिकांची वेळ बदललीये. त्यात 'लग्नानंतर होईलच प्रेम' ही मालिका आता दुपारच्या सत्रात चालवली जाणार आहे. तर दुपारच्या सत्रातील 'मुरांबा' ही मालिका लवकरच निरोप घेणार आहे. नुकतीच मालिकेच्या मुख्य अभिनेत्रीने याबद्दलची पोस्ट केली होती. त्यापाठोपाठ आता अभिनेता शशांक केतकर यानेही पोस्ट करत या बातमीला दुजोरा दिला आहे.