Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

Naach Ga Ghuma Review: मजेशीर कथा, भरपुर हसवणारी, शेवटवर्यंत काहीना काही गंमती घडत जाणारा नाच गं घुमा हा चित्रपट खरतर मजेशीर आहे.
'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड
Naach Ga Ghuma Reviewesakal

Naach Ga Ghuma Review: कोणत्याही कार्यालयात काम करणारी, व्यवसाय करणारी, घरचं काम पाहून नोकरी करणारी किंवा घरच्या कामासोबत कुटुंबाकडे लक्ष देत नोकरी करणारी प्रत्येक महिला ही वर्किंग वूमन असल्याचं आपण म्हणतो पण तिचं काय? जी आपल्या कुटुंबाचाच एक भाग झालेली असते, जिला आपण मदतनीस किंवा मोलकरीण म्हणून संबोधतो. तिला गृहीत धरलं जातय का ? ती वर्किंग वूमन नाहीय का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नाच गं घुमा (Naach Ga Ghuma) या या खुमासदार गोष्टीतून मिळतील. मजेशीर कथा, भरपुर हसवणारी, शेवटवर्यंत काहीना काही गंमती घडत जाणारा हा चित्रपट खरतर मजेशीर आहे. चित्रपटातील पात्रे देखील दैनंदिन जीवनात पाहतो तशीच आहेत.

प्रत्येक लग्न झालेल्या आणि मुलंबाळं असलेल्या स्त्रिची सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तारेवरची कसरत असते, तिच्या कसरतीत घरातली मोलकरीणची मदत तिला गरजेची वाटू लागते, तिची इतकी सवय झालीय की ती नसेल तर तिची कशी तारांबळ उडते अशा विषयावर या चित्रपटाची कथा आहे. हेच या चित्रपटात बघणं मजेशीर ठरतय. सोबत या मजेशीर कथेची महत्त्वाची आणि भावनीक अशी एक बाजू आहे, जी या कथेची मुळ बाजू आहे असं म्हणता येईल. या कथेत आहे राणी जी आहे मालकीणबाई, राणी ही तिचा पती आणि मुलगी चिकू असं छोटसं गोड कुटुंब आहे. राणी ही वर्किंग वुमन आहे त्यामुळे तिची मोलकरीण आशाताईचा तिच्या दैनंदिन जीवनात खूप मोठा मदतीचा हात आहे. मात्र काही कारणांमुळे आशा त्या घरातून निघून जाते आणि राणीची कशी तारांबळ उडते ही खरी गंमत या चित्रपटात पाहणं मनोरंजनात्मक आहे.

या चित्रपटाची कास्ट म्हणजेच विविध पात्र साकारणारे जे कलाकार आहेत ते या चित्रपटातील विविध भूमिकांमधून कथेत उत्तम रंग भरतात. अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, बालकलाकार मायरा वायकूळ, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, सुनील अभ्यंकर, मधुगंधा कुलकर्णी हे सगळेच कलाकार यात धमाल आणतात. मालकीणबाई मुक्ता बर्वे आणि मोलकरीण नम्रता संभेराव या दोघांची जोडी या चित्रपटाची जमेची बाजू आहे. या दोन्ही उत्तम अभिनेत्री जेव्हा एकाच फ्रेममध्ये येतात किंवा त्यांचे काही संवाद पाहणं एक ट्रीट आहे असं म्हणूयात. एकीकडे आपण नम्रताला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात पाहिलय, मात्र या चित्रपटात एक वेगळी नम्रता दिसते. आशाताईच्या भूमिकेत ती मनं जिंकते. मुक्ता बर्वे उत्तम अभिनेत्री आहेच पण या चित्रपटातून मुक्ता देखील काहीतरी वेगळं करताना दिसते आणि राणीच्या भूमिकेत कनेक्ट होणारी वाटते. चित्रपटातील विविध गाण्यांमध्ये मुक्ता कमाल डान्सही करताना दिसते. मुक्ताच काय तर सगळे कलाकार मनसोक्त नाचतात आणि जीव ओतून काम करतात.

'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड
Naach Ga Ghuma Reviewesakal
'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड
Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

लेखिका मधुगंधा कुलकर्णीने एक मजेशीर, गती असणारी, कमाल संवाद, विविध हटके पात्र असणारी या चित्रपटाची कथा लिहलीय. जी तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते, प्रचंड हसवते, काही ठिकाणी भावुकही करते. तर दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी उत्तम मांडणी केलीय. या चित्रपटातून प्रत्येक कलाकाराचे विविध पैलू काढून घेतलेत असं जाणवतं.चित्रपट सुरुवातीपासूनच जलद गतीने सुरु होतो, अगदी सुरुवातीपासूनच लाफ्टर येणारे संवाद आणि प्रसंग हे सुरुवातीपासूनच मजा आणतात. चित्रपटातील विविध इंटरेस्टिंग पात्र, कथा, गाणी, नाच, संवाद सगळ्याच गोष्टी छान जुळून आल्यात आणि त्या एकत्रीतपण भट्टी जमवतात आणि आपल्या समोर जे सुरुय त्यात आपण छान गुंतून जातो. खरतर समोर असलेली पात्रे जे काही बोलतायत, करतायत यामध्ये आपण इतके गुंतून जातो, त्यात मग छायांकन वैगेर तांत्रिक बाजूंकडे लक्षही जात नाही कारण तितका वेळही मिळत नाही. असे एकामागोमाग एक असे विनोदी पंच आणि प्रसंग आपल्याला प्रचंड हसवतात.

महत्त्वाचं काय तर जी मोलकरीण किंवा मदतनीस म्हणून काम करत असते ती देखील तिच्या दररोजच्या आयुष्यात संघर्ष करत असते. तिच्या नेमक्या काय व्यथा आहे हे देखील या चित्रपटातून समोर येतात. पण संपूर्णपणे हा चित्रपट भरपुर मनोरंजन करणारा आहे. त्यामुळे तुम्हाला खऱच मनमुराद आनंद लुटायचा असेल तर हा चित्रपट आवर्जुन पाहा कारण हा चित्रपट नुम्हाला नक्कीच रिफ्रेश करेल.

'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड
Naach Ga Ghuma: "हा चित्रपट म्हणजे घर घर की कहानी"; परेश मोकाशींनी सांगितली 'नाच गं घुमा'ची पडद्यामागील गोष्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com