
NANA PATEKAR
ESAKAL
मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीत आपली अभिनयाची छाप पाडणारे लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. नाना यापूर्वी अनेक कॉंट्रोव्हर्सीमध्ये अडकले आहेत. मात्र एका अभिनेत्रीने थेट त्यांच्यावर ते किळसवाणे असल्याचे आरोप केले होते. आणि ही अभिनेत्री काही छोटी अभिनेत्री नव्हती. तिने अनेक चित्रपटांमध्ये नानांसोबत काम केलं. दोघे चांगले मित्रही होते. मात्र मुलाखतीत तिने नाना पाटेकर म्हणजे नकारात्मक बाजू लपवून ठेवणारे व्यक्ती आहेत असं म्हटलं होतं. ती अभिनेत्री होती डिंपल कपाडिया.