NANA PATEKAR
esakal
NANA PATEKAR MADHOO YASHWANT MOVIE INCIDENT: मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत नाना पाटेकरांनी आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. नाना अभिनयासह त्यांच्या स्पष्ट वागण्यासाठी सुद्धा ओळखले जातात. त्यांचे अनेक किस्से सहकलाकार शेअर करत असतात. काहीजण काम करताना त्यांच्यासोबत वाद झाल्याचाही अनुभव शेअर करतात. अशातच एका मुलाखतीत एका अभिनेत्रीनं नानासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. यावेळी नानांनी कानशिलात मारल्याचही ती म्हणाली.