

NANA PATEKAR
esakal
आज सकाळी व्हॉलीबॉल चे गेम्स just संपवून सगळे बसलो असताना नाना पाटेकर यांना काळाने आपल्यापासून हिरावून घेतल्याची दुःखद बातमी आली.आदल्याच दिवशी माजी कसोटीपटू बलविंदर संधू यांच्याकडून पुण्यात 17ऑक्टोबर रोजी त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचे आमंत्रण आले होते.पुण्यात पी वाय सी जिमखान्यावर होणाऱ्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाना पाटेकर असणार होते. त्यानिमित्त नानाची स्टेज वर क्रिकेट संदर्भात प्रकट मुलाखत घेण्यासाठी बलविंदर संधूंशी आज बातचीत देखील करणार होतो. त्याबाबत विचारात असतानाच ही दुःखद बातमी येऊन थडकली. या बातमीमुळे मन मागे गेले ते थेट एक तप.