माझं सगळं जग एकाच जागी... नाना पाटेकरांना जाऊन १४ दिवस झाले; मुलगा मल्हार भावुक होत म्हणाला- त्यांना...

Nana Patekar Son Malhar Emotional Tribute Fourteen Days After Father’s Death: अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाला आता १४ दिवस झालेत. बाबांच्या निधनानंतर मल्हार पुन्हा एकदा भावुक झालेला पाहायला मिळाला.
malhar patekar on nana patekar

malhar patekar on nana patekar

esakal

Updated on: 

ज्येष्ठ मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी ८ ऑक्टोबर रोजी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांना आणि सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला. अजूनही अनेकांचा नाना गेल्याचं पटत नाहीये. नानांशिवाय ही इंडस्ट्री जणू पोरकी झालीये. नानांनी चित्रपटांसोबतच सामाजिक कार्यातही मोठं योगदान दिलं. त्यांच्या चाहत्यांना नानांच्या जाण्याचं इतकं दुःख आहे तर त्यांच्या पोटच्या पोराच्या दुःखाची आपण कल्पनाही करू शकत नाही. आपला पहाडासारखा बाप एका क्षणात गेला हे त्याच्याही मनाला पटत नाहीये. कोणत्याही संकटात मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार बाप अचानक निघून गेल्यावर मुलाने स्वतःला कसं सावरायचं असा प्रश्नच उभा राहतो. आज नानांना जाऊन १४ दिवस झालेत. त्यानंतर मल्हार पाटेकरने वडिलांच्या निधनावर दुःख व्यक्त केलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com