महाराष्ट्र सोडण्याच्या विचारात आहेत नाना पाटेकर? भर सभेत मंत्र्यांसमोर केलं विधान, म्हणाले, 'खेड्यातली माणसं...'

NANA PATEKAR CONTROVERSIAL STATMENT: मराठमोळे अभिनेते नाना पाटेकर यांनी भर कार्यक्रमात केलेलं एक मोठं विधान सध्या चर्चेत आहे.
NANA PATEKAR

NANA PATEKAR

ESAKAL

Updated on

मराठमोळे अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेसखकांची मनं तर जिंकलीच मात्र त्यासोबतच त्यांनी अनेक सामाजिक कामात पुढाकार घेऊन अनेक गावांचं रुपडं पालटलं. नाम फाउंडेशनच्या अंतर्गत त्यांनी अनेक गावांना जीवदान दिलं. मात्र आता त्यांनी आपण महाराष्ट्र सोडण्याचा विचार करत असल्याचं म्हंटल. नागपूरमध्ये नुकतीच जलक्रांती परिषद पार पडली. या परिषदेला अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपण महाराष्ट्र सोडून जाण्याचा विचार करत आहोत असं म्हटलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com