बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा एक्स पती संजय कपूर यांचं हृदयविकाराने निधन झालं आहे. पोलो खेळत असताना त्याने मधमाशी गिळली आणि त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यातच त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. दरम्यान संजय कपूर त्याच्या वयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असायचा. करिश्मा कपूरसोबत त्याचा दुसरं लग्न झालं होतं. संजय कपूरचं पहिलं लग्न हे फॅशन डिझायनर आणि सोशलाइट नंदिता महताना हिच्याशी झालं होतं.