

Entertainment News : बॉलिवूडमधील एक गाजलेलं प्रेमप्रकरण म्हणजे नर्गिस आणि राज कपूर. या जोडीने ऑनस्क्रीन प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंच पण प्रत्यक्षातही ही जोडी त्या काळी प्रेक्षकांना पसंत होती. विवाहित असूनही राज नर्गिस यांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. तर नर्गिस यांचेही राज यांच्यावर खूप प्रेम होते. पण नंतर काही कारणामुळे त्यांच्यात दुरावा आला.