
Marathi Entertainment News : बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता सूरज चव्हाणचा आता झापूक झुपुक हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पहिल्यांदाच या सिनेमातून सूरज हिरोच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा काल दणक्यात पार पडला. यावेळी अभिनेता रितेश देशमुखनेही सूरजला शुभेच्छा दयायला हजेरी लावली होती. रितेशचा नम्रपणा पाहून सगळेचजण भारावून गेले.