ARBAZ PATEL PROPOSES NIKKI TAMBOLI ON REALITY SHOW THE 50
esakal
बिग बॉस मराठी ५ मध्ये चर्चेत असलेले निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल हे एकमेकांना दीड वर्षापासून डेट करत आहेत. बिग बॉसच्या घरातच त्यांचं प्रेम फुललं. तेव्हापासून आजपर्यंत ते रिलेशनशिपमध्ये आहेत. दरम्यान आता निक्की आणि अरबाज 'The 50' या शोमध्ये सहभागी झाले आहेत. शोमध्ये दोघेही भांडताना पहायला मिळताय. परंतु दोघांतील प्रेम कमी झालेलं नाही. दरम्यान अशातच आता अरबाजने नॅशनल टेलिव्हिजनवर नक्कीला प्रपोज केलय.