Entertainment News: 'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळे सध्या चर्चेत आहेत. 'चला हवा येऊ द्या'च्या शोच्या दुसऱ्या भागात तो नसल्याने सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली. अनेकांनी त्याच्यावर टीका केली तर काहींना त्याला सपोर्ट केलं. परंतु 'हसताय ना हसायलाच पाहिजे' असं म्हणणाऱ्या निलेशचं शिक्षण डॉक्टरकीच असुनही तो इंडस्ट्रीत स्टार कसा बनला ते जाणून घेऊया. त्याने करिअरच्या इतक्या वर्षात लेखनासह दिग्दर्शन, अभिनय सगळं काही केलय.